Navi Mumbai : नवी मुंबई पोलीस आयुक्तपदाची सुत्रे हातात घेताच नवनियुक्त आयुक्त मिलिंद भारंबे ( Police Commissioner Milind Bharambe) यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे. नवी मुंबई पोलीस मुख्यालय तसेच पोलीस ठाणे स्तरावर सुरू असलेल्या अवैद्य धंद्याला चाप बसवण्यासाठी नवीन पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेले आहेत. तसेच सदनिका भाड्याने देणाऱ्यांसाठीही पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या हद्दीत आता सदनिका भाड्याने (renting flats) देताना पोलिसांची ना हरकत प्रमाणपत्र (noc) घेणे बंधनकारक नसणार आहे. मात्र घरमलकाने भाडेकरू बरोबर केलेला करार आणि त्याची माहिती स्थानिक पोलीसांना फक्त सादर करण्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत.


त्याचप्रमाणे नंबरप्लेट बनवणारे, सायब्ररकॅफे चालवणारे, सिमकार्ड विक्रेते यांनी देखील ग्राहकांची माहिती घ्यावी अशा सूचना पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत. पोलीस उपयुक्त प्रशांत मोहिते यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. तसेच पासपोर्ट पडताळणी, चारित्र्य पडताळणी सारख्या इतर सुविधांसाठी दीड महिना कालावधी लागत असल्याचे पुढे आल्यानंतर आता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सात ते 15 दिवसांत या सुविधा मिळणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.