मनसुख हिरेन प्रकरणात आणखी एक पोलीस अधिकारी निलंबित
मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपी सुनिल मानेचे पोलीस दलातून निलंबन करण्यात आले आहे.
मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांची कार आणि मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपी सुनिल मानेचे पोलीस दलातून निलंबन करण्यात आले आहे.
मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांची कार सापडली होती. त्या कारचा पूर्वीचा मालक मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणाचा तपास एनआयएने हाती घेतला होता.
क्राईम ब्रँचचे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना याप्रकरणी एनआयए अटक केली. त्यांच्या तपासातून समोर आलेल्या बाबींनंतर अनेकांना एनआयएने ताब्यात घेतले आहे. तसेच सचिन वाझे यांच्या 7-8 कार जप्त केल्या आहेत.
सचिन वाझे यांच्यासह मनसुख हिरेन यांच्या कटात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या रियाज काझी नंतर सुनिल माने याचेही पोलीस दलातून निलंबन झाले आहे.