मुंबई : मुंबईच्या एन एम जोशी मार्गावरील एका स्पा सेंटरमध्ये धाड टाकत वेश्याव्यवसाय करणाऱ्या 5 जणांना अटक केली असून परदेशी नागरिक असलेल्या महिलांची महिला पुनर्वसन केंद्रात रवानगी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एन एम जोशी मार्ग पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, लोअर परळ येथील एका लोकप्रिय मॉलमध्ये असलेल्या स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू होचा. पोलिसांनी या स्पा सेंटरचा कारनामा उघड करण्यासाठी सापळा रचला. बनावट ग्राहक पाठवून तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत पाच जणांना अटक केली असून सहा महिलांची सुटका केली आहे. 


सुटका केलेली सर्व सहा महिला या परदेशी नागरिक असल्याची माहिती मिळाली आहे.   


आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून आरोपीना पोलीस कोठडी सुनावली आहे तसेच सुटका केलेल्या महिलांना पुनर्वसनगृहात पाठवण्यात आले आहे.