मुंबई : एसटी संपकरी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्ने सदावर्ते (Adv Gunratna Sadavrte) यांच्या घरी पोलिसांचं पथक दाखल झालं आहे. सदावर्ते यांच्या घराची झाडझडती घेण्यासाठी गावदेवी पोलिसांचं (Mumbai Police) पथक पोहचलं आहे. पोलीस तपासाच्या अनुषगांने घरी आल्याची माहिती आहे.  (police team arrives at advocate gunratna sadavarte house for detail inquiry)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्वर ओक  बंगल्यावर शुक्रवारी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी घेराव घातला. काही आंदोलकांनी पवारांच्या घरावर दगडफेक आणि चप्पलफेकही केली. या घटनेला जबाबदार धरून वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली.


अटकेनंतर सदावर्ते यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने सदावर्ते यांना शुक्रवारी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्या घटनेच्या चौकशीसाठी पोलिसांनी सदावर्ते यांना गावदेवी पोलीस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली.  
पोलीस उप आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी सदावर्ते यांनी ही चौकशी केली. 


या चौकशीनंतर गावदेवी पोलिसाचं पथक हे सदावर्ते यांच्या राहत्या घरी दाखल झालंय. या प्रकरणातील सविस्तर चौकशीच्या अनुषगांने पोलीस पथक घरी गेलं असल्याचं समजतंय.