मुंबई : मुंबई पोलीस दलातील एका कॉन्स्टेबलनं गेल्या दोन महिन्यांपासून पगार न मिळाल्याचं सांगत 'खाकी परिधान करत भीक मागण्याची' परवानगी मागितलीय. त्याच्या म्हणण्यानुसार वेतन न मिळाल्यानं आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेण्यात आपण अपयशी ठरत आहोत. आपल्या विभागाच्या वरिष्ठ पोलीस आयुक्त दत्ता पडसलगिकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय. या पत्रात कॉन्स्टेबल दन्यनेश्वर अहिररावनं आपल्या आजारी पत्नी आणि घराच्या खर्चासाठी भीक मागण्याची मंजुरी देण्याची मागणी केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण 20 मार्च ते 22 मार्च दरम्यान सुट्टी घेतली होती. परंतु, पत्नीच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यानं सुट्टी संपल्यानंतरही तो कामावर हजर होऊ शकला नाही, असं शस्त्र दलाशी संबंधित अहिररावनं आपल्या पत्रात म्हटलंय. उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी 'मातोश्री'च्या सुरक्षा दलात तैनात अहिररावनं दावा केल्यानुसार आपल्या सिनिअर अधिकाऱ्यांना सुट्टी घेण्याबद्दलही माहिती दिली होती.... आणि पत्नीची तब्येत सुधारल्यानंतर 28 मार्च रोजी कामावर परतला. परंतु, यानंतर त्याचं वेतन रोखलं गेलं आणि यासंबंधी जास्त माहितीही दिली गेली नाही.


कॉन्स्टेबलनं पत्रात लिहिल्याप्रमाणे 'मला माझ्या आजारी पत्नीची काळजी घ्यायची होती. वडीलदारी आई - वडील आणि एका मुलीची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. याशिवाय कर्जाचा हफ्ताही दर महिन्याला द्यावा लागतो. परंतु, जेव्हा वेतन रोखलं गेलं. मी हा खर्च करण्यासाठी असमर्थ ठरतोय. यासाठी मी तुमच्याकडे खाकी वर्दी परिधान करून भीक मागण्यासाठी मंजुरी मागत आहे'. 


यासंबंधी अधिक माहिती घेण्यासाठी अहिररावशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु, तो होऊ शकला नाही.