मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) शनिवार सर्वांनाच आश्चर्याचा जोरदार धक्का देत भाजपच्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री तर राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar ) यांनी उपमुख्यमंत्रीपदाच शपथ घेतली. सरकार बनण्याच्या या सर्व घडामोडी कशा घडल्या तेही जाणून घ्या...


२२ नोव्हेंबर २०१९


रात्री ९.०० वाजता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- शरद पवार सिल्व्हर ओकवर पोहोचले


रात्री १०.०० वाजता


- उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे मातोश्रीवर पोहोचले


- दिवसभर महाविकासआघाडीची मॅरेथॉन खलबतं झाली होती... सगळं ठरलं होतं... अजूनही चर्चा सुरूच राहणार म्हणून बऱ्यापैकी पांगापांग झाली होती... तशी ती रात्र शांत होती...


रात्री १२.०० वाजता 


- राज्यपाल जागे होते... फडणवीस जागे होते... रात्रीस खेळ चालेचा एपिसोड राजभवनावर सुरू झाला...


रात्री १२.३० वाजता


- अजित पवारांनी पाठिंब्याचं पत्र दिलं, त्याआधीच रात्री ९.३० ला फडणवीसांनी सत्तास्थापनेचा दावा केला होता


रात्री १.०० वाजता


- राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट मागे घेण्याची शिफारस


रात्री १.३० वाजता


- दिल्लीत राष्ट्रपती राजवट मागे घेण्यासाठी राष्ट्रपतींनी सही केली


रात्री २.०० वाजता


- राष्ट्रपती राजवट मागे घेण्याचं पत्र पाठवण्यात आलं


रात्री २.३० वाजता


- सकाळी शपथविधी करण्याच्या सूचना देण्यात आल्या


- पहाटे कॅबिनेटची बैठक झाली आणि ८ वाजता शपथविधी पार पडला



रात्रीचा खेळ सकाळी ८.०० वाजता संपला होता. अवघा महाराष्ट्र झोपेतून उठला तेव्हा राज्यातून राष्ट्रपती राजवट उठली होती. नवं सरकार आलं होतं... एका रात्रीत महाराष्ट्राचं राजकारण ३६० अंशात बदललं होतं.