मुंबई : मुंबईत मंगळवारी निर्माण झालेल्या जलसंकटावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिवृष्टीमुळे मुंबई कोलमडली मात्र त्याला केवळ शिवसेना जबाबदार नसून एमएमआरडीए आणि इतर यंत्रणाही जबाबदार असल्याचा आरोप महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी केलाय.


तर गेली २० वर्षे उपभोगून जर हीच परिस्थिती राहणार असेल तर शिवसेनेला पालिकेत सत्तेवर बसायचा काही अधिकार नाही, अशी खरमरीत टीका सोमय्या यांनी केलीय. 


दुसरीकडे, पावसात मुंबई बुडाली याला सर्वस्वी महापालिका सत्ताधारी आणि पहारेकरी भाजप जबाबदार आहेत, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केलाय. हजारो कोटींची कामं केल्याचा दावा सत्ताधारी करत होते मग मुंबई तुंबली कशी? असा प्रश्न त्यांनी विचारला. हायकोर्टाच्या माजी न्यायमूर्तींची समिती गठीत करून चौकशी करावी, अशी मागणी मुंडे यांनी केली.