दुर्घटनेनंतर... एलफिन्स्टन रोड स्टेशनवर पोर्टेबल तिकीट खिडकी सुरू
एलफिन्स्टन रोड स्थानकाकडील पादचारी पुलावरील तिकीट खिडकीसाठी पर्याय ठरलेली पोर्टेबल तिकीट खिडकी सुरू करण्यात आलीय.
मुंबई : एलफिन्स्टन रोड स्थानकाकडील पादचारी पुलावरील तिकीट खिडकीसाठी पर्याय ठरलेली पोर्टेबल तिकीट खिडकी सुरू करण्यात आलीय.
एल्फिन्स्टन रोड पुलावर झालेल्या दुर्घटनेनंतर हाती घेण्यात आलेल्या उपयांमध्ये पुलावरील तिकीट खिडकीचं अन्यत्र स्थलांतर करण्याची प्रमुख सूचना आहे.
पश्चिम रेल्वे प्रशासनाने त्याची अंमलबजावणी करताना पुलाजवळच उभारलेली पोर्टेबल तिकीट खिडकी सुविधा सुरू झालीय.
पोर्टेबल तिकीट खिडकी ही कंटेनर बॉक्सचा वापर करून तयार करण्यात आलीय. त्यामुळे जागेची अडचण होत नसल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.