मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाण्यातल्या उत्तरसभेत (MNS Uttar Sabha in Thane) मशीदीवरील भोंग्यावरुन इशारा दिला आहे.   3 मे आधी म्हणजेच ईद आधी मशीदीवरील भोंगे उतरवले गेले पाहिजेत. तसं न झाल्यास हनुमान चालिसा वाजवली जाईल, हनुमान चालिसाने नाही झालं तर पुढचंही ठरलेलं आहे, माझ्या भात्यातला तो पुढचा बाण अजून मी काढलेला नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरेंविरोधात पोस्टरबाजी
राज ठाकरे यांच्या या भूमिकेवरुन मनसेला डिवचण्यात आलं आहे. शिवसेना भवनासमोर राज ठाकरे यांच्या विरोधात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. काल मुस्लिम, आज हनुमान आणि उद्या??? अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. अज्ञात व्यक्तींनी शिवसेना भवनासमोर पोस्टर लावले आहेत.



राज ठाकरे नेहमी आपली भूमिका बदलतात, आपल्या भूमिकेवर ते ठाम नसतात अशा आशायचा हा बॅनर आहे. बॅनरवर तीन फोटोंची जागा असून पहिल्या जागेत राज ठाकरे यांचा मुस्लीम वेशभूषेतील फोटो लावण्यात आला आहे. त्यावर काल असं लिहिलेलं आहे. तर दुसऱ्या जागेत हनुमान असा उल्लेख करण्यात आला आहे. तिसरी जागा रिकामी ठेवण्यात आली असून त्यात मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. 


आता या बॅनरला मनसे काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.