खड्डे दुरुस्ती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली तंबी
Road Pothole Repair : राज्यात अनेक प्रमुख मार्गांवर खड्डेच खड्डे (Pothole) पडलेले दिसून येत आहे. प्रामुख्याने मुंबई - गोवा महामार्गाची परिस्थिती अंत्यंत वाईट आहे.
मुंबई : Road Pothole Repair : राज्यात अनेक प्रमुख मार्गांवर खड्डेच खड्डे (Pothole) पडलेले दिसून येत आहे. प्रामुख्याने मुंबई - गोवा महामार्गाची परिस्थिती अंत्यंत वाईट आहे. तर मुंबईतही अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे दिसून येत आहे. खड्ड्यात रस्ते गेल्याने विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. आता या खड्ड्यांबाबत राज्य सरकारनेही मोठे पाऊल उचलले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांना (Road Pothole) जबाबदार कंत्राटदारांची गय करणार नाही, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिला आहे. यापुढे जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करणार, अशी तंबीच मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली आहे.
खड्डे दुरुस्ती, (Road Pothole Repair) उपाययोजनांबाबत राज्य सरकारने एक बैठक घेतली. ही बैठक दोन तास चालली. बैठकीला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण उपस्थित होते. दरम्यान, यावेळी राज्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, मात्र या निधीचा विनियोग व्यवस्थित झाला नाही, कामचुकारपणा केल्याचे निदर्शनास आले तर संबंधित कंत्राटदाराची गय केली जाणार नाही, अशी तंबी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.
या रस्त्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यावर आहे, त्यालाही जबाबदार धरून तात्काळ कारवाई केली जाईल. अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले. रस्ते दुरुस्तीच्याबाबतीत नवीन तंत्रज्ञानाचा कटाक्षाने वापर करावा तसेच जास्त पावसाच्या भागात डांबरीकरणाएवजी काँक्रीटमधले रस्ते बांधण्यावर भर द्यावा असेही ते म्हणाले.