मुंबई: येत्या आठ दिवसात कोकणातील रस्ते खड्डेमुक्त होतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मुंबई-गोवा महमार्गावर पडलेले खड्डे त्याची पाहणी करण्यासाठी चंद्रकांत पाटील कोकणात आले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, महामार्गाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. देखभालीची जबाबदारी घेतलेल्या कंपनीनेच हे खड्डे भरले पाहिजेत. संबंधित कंपन्यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार काम सुरु आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 


 


कोकणात जाण्यासाठी रेल्वेकडून जादा गाड्या


गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी पाहता कोकण रेल्वे, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून विशेष गाड्या चालविण्यात येतात. मात्र, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्यामुळे मध्य रेल्वेने अतिरिक्त विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. या विशेष गाड्याचे बुकिंग २ सप्टेंबरपासून चाकरमानी या विशेष गाड्याचे आरक्षण करु शकणार आहेत.