मुंबई : पावसाने मुक्काम ठोकल्यानंतर आता मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डयांमुळे पालिकेचा ढिसाळ कारभार उघडा पडला आहे. खुद्द महापालिका मुख्यालयासमोरच्या रस्त्यावरच खड्डे पडले आहेत. पालिकेने बनवलेल्या सेल्फी पॉईंटजवळ काँक्रीटच्या रस्त्यावर हे खड्डे पडले असून ते बुजवण्याची तसदीही बीएमसीनं घेतलेली नाही. जर मुख्यालयासमोरच्या रस्त्यांवरील खड्डयांकडे दुर्लक्ष होत असेल तर मग शहरातील छोट्या रस्त्यांवरील खड्डे बीएमसीला दिसणार तरी कसे असा प्रश्न निर्माण होतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत मुसळधार पाऊस सुरु झाला आणि मुंबईतल्या रस्त्यांचं वास्तव समोर आलं. रस्त्यांवर केवळ खड्यांचं साम्राज्य असल्यानं वाहन चालक आणि प्रवासी दोघांचेही हाल होत आहेत. याला सायनमधील प्रतीक्षानगरही अपवाद नाही. प्रतीक्षानगरमधले नागरिक खड्ड्यांना हैराण झाले आहेत.


मुंबई पालिका मुख्यालयासमोरील या खड्ड्यांना जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होतोय. या खड्ड्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी लक्ष देणार का ?