मुंबई: पवई तलावात रविवारी गणपती विसर्जनादरम्यान एक अपघात घडला. याठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांच्या मुर्तींचे क्रेनच्या साहाय्याने विसर्जन करण्यात येते. अशाच एका सार्वजनिक मंडळाचा गणपती क्रेनच्या सहाय्याने तलावातील तराफ्यावर ठेवण्यात येत होता. यावेळी अचानक क्रेनचा पट्टा सुटला. यामुळे गणपतीची मूर्ती जीवरक्षकांच्या अंगावर पडली. सागर चँदेलिया आणि रफिक शेख अशी या दोन जीवरक्षकांची नावे आहेत. यावेळी सागर आणि रफिकने प्रसंगावधान राखत क्रेनचा पट्टा पकडला. त्यामुळे जीवितहानी टळली. मात्र, या घटनेमुळे पालिका प्रशासनाचा गलथानपणा उघड झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, सोमवारी सकाळी लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना टळली.


विसर्जनासाठी जाणाऱ्या ताफ्यातली बोट समुद्रात बुडाली. बोटीतल्या पाचही जणांना वाचवण्यात यश आले.


काजल मेयर, अवनी, निलेश भोईर, अदनान खान, अनिता हे भाविक राजाच्या विसर्जनासाठी चालले होते. यावेळी त्यांची बोट समुद्रात बुडाली. मात्र या पाचही जणांना वाचवण्यात आले.