मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात संचारबंदी, लॉकडाऊन आहे. महाराष्ट्रातील जनता देखील सोशल डिस्टन्शिंग सांभाळत आहे. असं असताना मोदींनी ५ एप्रिल रोजी ९ वाजता ९ मिनिटे दिवे लावण्याचं जे आवाहन केलं आहे. त्यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी टीका केली आहे.  जनतेने मोदींच्या हा आवाहनाला बळी पडू नये असं आवाहन नितीन राऊत यांनी केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदींच आवाहन म्हणजे शुद्ध पोरकटपणा आहे. साठी बुद्धी नाटी असं म्हटलं जातं. नरेंद्र मोदी कोणत्याही गोष्टीचा इव्हेंट करतात. ही बाब देशाच्या पंतप्रधानाला शोभत  नाही. देशाच्या १३० करोड जनेतेने एकाच वेळी दिवे बंद केल्याने ग्रीड  फेल झाले तर तांत्रिक बिघाड निर्माण होऊ शकतो. देशातील विजपुरवठ्यात अडथळा येऊ शकतो. पंतप्रधान म्हणून अपल्याला हे शोभत नाही.('सर्वांनी एकावेळी वीज बंद केली तर विद्युतसंचावर परिणाम होईल') 


महाराष्ट्राची सद्यस्थिती ही वेगळी आहे. विजेची मागणी ही २३,००० मेगावॅट वरून १३,००० मेगावॅटवर आली आहे. लॉकडाऊनमुळे इंडस्ट्रीयल लोड हा झिरो आहे. १३,००० मेगावॅट ही फक्त अत्यावश्यक सेवा आणि घरगुती वापरासाठी वापरली जात आहे. जर सर्वांनी अचानक दिवे बंद केले तर ग्रिड फेल होईल. सर्व पॉवर स्टेशन हाय फ्रिक्वेन्सीवर ट्रिप होतील. संपूर्ण राज्य अंधारात जाईल. महाराष्ट्रा सारखे मोठे पॉवर डिमांड असलेल्या राज्यात जर ग्रीड फेल्युअरमुळे सर्व पॉवर स्टेशन बंद पडले तर मल्टीस्टेट ग्रीड फेल्युअर होऊन संपूर्ण देश अंधारात जाईल. अत्यावश्यक सेवा हॉस्पिटल सेवा विस्कळीत होईल. सर्व परिस्थिती नॉर्मल व्हायला एक आठवडा तरी जाईल. 


मी महाराष्ट्राचा  ऊर्जा मंत्री म्हणून मी जनतेला आवाहन करतो कोणीही आपल्या घरचे दिवे ५ एप्रिलला बंद करू नका. . मोदींनी सांगितल्याप्रमाणे दिवे लावायचे असेल तर लावा मात्र इलेक्ट्रिक बल्ब  बंद करू नका. मोदी देशाच्या जनतेला पागल बनवत असेल तर तुम्ही खुशाल पागल बना. मात्र ऊर्जा मंत्री म्हणून तुम्हाला धोक्यापासून सावध  करत आहे. उद्या काही समस्या आली तर पंतप्रधान जबाबदार राहतील. ('पंतप्रधान असल्यासारखे मोदी वागणार आहेत का?')



असं असताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मोदींच्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे. नागरिकांना कोरोनाशी लढण्यासाठी या उपक्रमात सहभागी व्हायला हवं. आपण एकटे नाहीत सगळ्यांनी एकत्र मिळून हा उपक्रम साजरा करूया आणि कोरोना विरोधातील ही लढाई जिंकूया.  जितेंद्र आव्हाडांनी देखील याबाबत मोदींवर टीका केली आहे.