प्रभाकर साईल याचा समीर वानखेडे यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप? स्टिंग ऑपरेशनमध्ये ही बाब आली समोर
Aryan Khan Drugs Case : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नवे ट्विस्ट येत आहेत.
मुंबई : Aryan Khan Drugs Case : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नवे ट्विस्ट येत आहेत. या प्रकरणात प्रभाकर साईल (Prabhakar Sail) यांने NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आठ कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला आहे. आता याप्रकरणी एक स्टिंग ऑपरेशन समोर आले आहे. ज्यामध्ये प्रभाकर साईल याने पैशासाठी हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. मात्र, 'झी न्यूज' या स्टिंगला दुजोरा देत नाही.
भाजप नेत्याने स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ शेअर केला आहे. भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आणि लिहिले, 'नोटरी रामजी गुप्ता (Ramji Gupta) यांचे स्टिंग ऑपरेशन. प्रभाकर साईल (Prabhakar Sail) याने किरण गोसावी याच्या पैशासाठी हे सर्व केल्याचे रामजी यांनी सांगितले. यामागे मियां नवाब आणि मनोज असल्याचे ते स्पष्टपणे सांगत आहेत.
स्टिंग ऑपरेशनमध्ये काय आहे?
मोहित कंबोज याने (Mohit Kamboj) याने हे स्टिंग नोटरी रामजी गुप्ता (Ramji Gupta) यांचे असल्याचा दावा केला असून त्यात तो म्हणत आहे की, प्रभाकर साईलने किरण गोसावीकडे बॉडीगार्ड असल्याने त्याच्याकडे पैशांची मागणी केली होती आणि त्याच्यासोबत हे सर्व घडले आहे.
नवाब मलिक यांचा नवा दावा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक (NCP Leader Nawab Malik) यांनी ट्विट करून एक नवीन पत्र शेअर केले आहे आणि एनसीबीच्या अधिकाऱ्याने आपल्याला हे पत्र दिल्याचा दावा केला आहे. हे पत्र शेअर करताना नवाब मलिक म्हणाले की, एक जबाबदार नागरिक म्हणून मी हे पत्र डीजी नार्कोटिक्सला पाठवत आहे आणि समीर वानखेडे यांच्यावर होत असलेल्या चौकशी तपासात हे पत्र समाविष्ट करण्याची विनंती करतो.