मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस केंद्रातील 'एनडीए'त सहभागी होणार नसल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या केवळ अफवा पसरवल्या जात आहेत. त्याला कोणताही आधार नसल्याचं त्यांनी ट्विटरवर स्पष्ट केलं आहे.


 गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपबरोबर जवळीक वाढत चालल्याचा बातम्यांना ऊत आलाय. त्यामुळं पटेलांनी याबाबत खुलासा केलाय. प्रफुल्ल पटेल यांच्या टवीट नंतर राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामिल होणार का? ही चर्चा तुर्तास तरी थांबणार आहे.