Maharashtra Politics, मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारे वक्त वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले आहे. शरद पवार (sharad pawar) लेफ्टला पाहतात आणि राईटला हात देतात असा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला आहे. वंचितची युती शिवसेनेशी. महविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जाण्याची इच्छा नाही असं प्रकास आंबेडकर म्हणाले आहेत. आंबेडकर यांच्या विधानामुळे चर्चांना उधाण आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपली युती शिवसेनेशी आहे महविकास आघाडीशी नाही. त्यामुळे महविकास आघाडी जाण्याची इच्छाही नाही असं विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.  तसंच पवार हे लेफ्टला पाहतात आणि राईटला हात देतात असा टोला देखील आंबेडकर यांनी पवारांनी लगावला आहे. आंबेडकर यांच्या या भूमिकेमुळे वंचित मविआत जाण्याची शक्यता धूसर झाली आहे. 


आम्ही वंचित असू तर आमची दखल नका घेऊ. महाविकास आघाडीचा भाग होण्याची माझी इच्छा नाही अस मी म्हणाणार नाही. पणं आमची युती शिवसेनेशी आहे. जागा वाटपाबाबत उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली आहे. शिवसेना आणि वंचित एकत्र लढली आणि बाकी एकत्र नाही आले तरी आम्ही सरकार बनवू असे आंबेडकर म्हणाले. 


भाजप सत्ता टिकवण्यासाठी इडी, आयकर, IB, स्थानिक पोलीस यांना वापर करती. जो त्यांचे ऐकणार नाही त्यांच्यासाठी आर्थर रोड जेल मोकळा आहे असं म्हणत त्यांनी भाडपवर निशाणा साधला. 
राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना जो पर्यंत सामंजस्याने चर्चा तरत नाहीत तोपर्यंत आघाडी मध्ये कोणाला घ्यायचे आणि कोणाला घ्यायचे नाही याचे एकमत होत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना त्यांची भूमिका घ्यावी लागेल. शिवसेना आणइ वंचित आघाडी हे एकत्र निर्णय घेतील.


प्रकाश आंबेडकर यांनी दोन वेळा उद्धव ठाकरे यांच्याकडे युती संदर्भातील प्रस्ताव दिला होता. यामुळे मागील अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबडेकर यांची शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र येणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यामुळे युतीबाबच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.