मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडेंना अटक केली नाही तर २६ मार्चला मुंबईत धडक मोर्चा आणू असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला. 


२६ मार्चपर्यंत मुदत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संभाजी भिडेंविरोधात अजामीनपत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ मार्चपर्यंत आम्ही मुदत देतो आहोत. कायदा सगळ्यांना सारखा आहे. मिलिंद एकबोटेंना अटक झाली आता संभाजी भिडे यांना २६ मार्चपर्यंत अटक झाली नाही तर मुंबईत धडकणार आहोत आणि जोपर्यंत संभाजी भिडेंना अटक केली जात नाही तोपर्यंत मुंबईचा ताबा सोडणार नाही, असा इशाराच प्रकाश आंबेडकरांनी दिला.


एकबोटेंना पोलीस कोठडी


दरम्यान, कोरेगाव-भीमा प्रकरणी आरोपी असणाऱे मिलिंद एकबोटे यांना आज १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. शिवाजीनगर कोर्टात आज मिलिंद एकबोटेंना हजर करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी एकबोटेंची कोठडी मागितली. त्यावर कोर्टानं हा निर्णय दिला. पोलिसांनी काल अडीच महिन्यानंतर एकबोटेंना अटक केली होती. त्याआधी सर्वोच्च न्यायालयानं त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.