दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : 'मुख्यमंत्र्यांनी सांगितले तर गृहनिर्माण खाते सोडेन, असं म्हणत मेहतांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवलीय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बायकोचं नाव बदललंय इतक्या हीन दर्जेचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यानं करणं, हे त्यांच्या गरीमेला शोभा देत नाही' असंही प्रत्युत्तर मेहता यांनी विरोधकांना दिलंय. गेले चार दिवस विरोधकांनी प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलीय.


मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर गृहनिर्माण मंत्रीपद सोडण्याची तयारी प्रकाश मेहता यांनी केलीये. एसआरए प्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे मेहता अडचणीत आलेत. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत त्यांची पाठराखण केली असली तरी त्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायम आहे. या पार्श्वभूमीवर आता  चौकशी होईपर्यंत गृहनिर्माण खातं सोडण्याची तयारी मेहतांनी दाखवली असली, तरी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तरच राजीनामा देऊ, असं सांगून चेंडू फडणवीसांच्या कोर्टात टोलवलाय.