मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची कंगना रनौतवर कारवाईची मागणी केली आहे. मुंबईची बदनामी केल्याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांकडे कारवाई करण्याची मागणी आमदार प्रताम सरनाईक यांनी केली आहे. अध्यक्षांनी गृह विभागाला 24 तासात अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रताप सरनाईक यांनी ट्विट करत म्हटलं की, 'मुंबईची पाकव्याप्त काश्मीर व तालिबानशी तुलना करून बेछूट आरोप करणाऱ्या कंगनावर योग्य ती कारवाई करण्याची लेखी विनंती मी आज विधानसभा अध्यक्षांना केली. त्यांनी गृहमंत्र्यांना याची तातडीने चौकशी करून 24 तासात अहवाल सादर करण्यास सांगितले.'



याआधी प्रताप सरनाईक यांनी कंगना विरुद्ध केलेल्या ट्विटमुळे महिला आयोगाने सरनाईक यांना अटक करण्याची मागणी केली होती. पण प्रताप सरनाईकांनी आपल्या विधानावर ठाम असल्याचं म्हटलं होतं.