हा तर फुसका बार, दरेकरांची राऊतांच्या पत्रकार परिषदेवर खोचक टीका
Sanjay Raut PC : संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजप आणि तपास यंत्रणांवर अनेक आरोप केले आहेत.
मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपानंतर आता भाजपकडून देखील प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी हा तर फुसका बार असल्याची टीका केली आहे. (Pravin darekar Reaction on sanjay raut press conference)
'किरीट सोमया यांचा मुलगा किंवा मोहित कंबोज हे काय भाजपचे नेते नाहीत. त्यांच्या विरोधात पुरावे आहेत. तर द्या ना. राऊतांच्या या पत्रकार परिषदेत कोणतेही मोठे नेते नव्हते. आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित नव्हते. त्यामुळे संजय राऊत हे एकटे पडले आहेत.' अशी टीका विधानपरिषेदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
'सरकारचे तुम्ही शिल्पकार आहेत. अडीज वर्षापासून तुम्ही सत्तेत आहेत. सरकार राऊतांच्या पुढाकाराने झाला. मग आतापर्यंत गप्प का होतात. पुरावे नाही द्यायचे आणि प्रसार माध्यमांसमोर बोलायचं.'
'मोहित कंबोज हे पुरावे देत आहेत. ते सक्षम आहेत. ते उत्तर देतील. त्यांना दाबण्याचं काम सुरु आहे. हे सोयीचं राजकारण सुरु असल्याचं,' प्रवीण दरेकरांनी म्हटलं आहे.