मुंबई :  ED Chargesheet Against Pravin Raut : प्रवीण राऊत यांना मिळालेले 50 कोटी रूपये हे गुन्हेगारीशी संबंधित असल्याचं ईडीने आपल्या चार्जशीटमध्ये म्हटले आहे. गोरेगावच्या पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात विकासकाकडून मोबदला म्हणून 50 कोटी रूपये मिळाल्याचा दावा प्रवीण राऊत यांनी केला होता. तो दावा ईडीने फेटाळला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असा काही मोबदला प्रवीण राऊतला दिल्याचे गुरूआशिष कंपनीच्या मुख्य आर्थिक अधिकाऱ्याने अमान्य केल्याचं ईडीने चार्जशीटमध्ये म्हटले आहे. कंपनीच्या खातेवहीतही त्याची नोंद नाही. 


2008 ते 2010 मध्ये राऊतच्या खात्यात दोनवेळा एचडीआयएलकडून 50 कोटी आणि 45 कोटींची रक्कम जमा झाली. या व्यवहाराचं ठोस कारण राऊत देऊ शकले नाही, असे चार्जशीटमध्ये म्हटले. म्हाडाकडून एफएसआय मिळवून देण्यासाठी राऊत यांनी लाचखोरी केल्याचे चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आले आहे.