मुंबई : उकाड्यामुळे उत्तर भारतातील लोकं हैराण झाले आहेत. महाराष्ट्रात ही अनेक ठिकाणी पारा 40 ते 45 अंशावर जावून पोहोचला आहे. घराघरात कूलर आणि एसी पाहायला मिळत आहे. पण मुंबईकरांना मात्र काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईत मान्सून पूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 45 अंशांच्यावर पोहोचला आहे. मुंबईत मात्र पावसामुळे आता काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईत हलक्या सरी कोसळू शकतात. येत्या 48 तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज देखील मुंबईत मोठ्य़ा प्रमाणात गरम वातावरण आहे.



मुंबईत पावसाची शक्यता असली तरी हा प्री मॉन्सून आहे. मान्सून 7 जूनला केरळमध्ये दाखल होणार आहे. स्कायमेटने हा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पण या पावसामुळे मुंबईत पाऊस आणखी लांबू शकतो.


केरळमध्ये 7 जूनला मॉन्सून दाखल झाल्यानंतर तो दिल्लीमध्ये जुलैपर्यंत पोहोचतो. दिल्लीमध्ये देखील पारा 45 अंशावर आहे. याचा मोठा परिणाम पर्यटनावर देखील होत आहे.