मुंबई : ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी होत असून यासाठी शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी विधिमंडळ परिसरमध्ये सुरू आहे . विधिमंडळ परिसरातील पार्किंगच्या जागेत मुख्य स्टेज उभारण्यात आले असून भव्य मंडप बांधण्यात आले आहेत. 500 पेक्षा जास्त जण बसतील अशी व्यवस्था करण्यात येत आहे. या मंडपामध्ये 10 पेक्षा जास्त स्क्रीन उभारले जात आहेत. विधिमंडळ परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रविकासआघाडी सरकारचा पहिला आणि बराच काळ लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार उद्या होत आहे. विधानभवनाच्या समोरील प्रांगणात हा विस्तार पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहा मंत्र्यांनी 28 नोव्हेंबरला शपथ घेतली होती. त्यानंतर महिनाभरापासून सात मंत्रीच राज्याचा कारभार बघत आहेत. या सरकारचा विस्तार लांबत असल्यानं विरोधकांकडूनही टीका होत होती. 


अखेर बराच काळ लांबलेला हा मंत्रिमंडळ विस्तार उद्या होतो आहे. या विस्तारामध्ये शिवसेनेचे १३ मंत्री शपथ घेतील. त्यात १० कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ मंत्री शपथ घेतील. त्यात १० कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री शपथ घेणारेत. तर काँग्रेसचेही १० मंत्री शपथ घेणार असून यात ८ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.