दीपक भातुसे/ मुंबई :  राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मते फुटली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संख्याबळानुसार राज्यात काँग्रेसचे 42 आणि राष्ट्रवादीचे 41 मिळून 83 आमदार आहेत. मात्र काँग्रेसच्या उमेदवार मीरा कुमार यांना 77 मते मिळाली आहेत. म्हणजेच काँग्रेसची कमीत कमी सहा मते फुटली आहेत. दुसरीकडे काँग्रेसला साथ देण्याचा वादा करणाऱ्या शेकाप, समाजवादी पार्टीसह बहुजन विकास आघाडी, एमआयएम, मनसे, भारीप आणि सर्व अपक्षांची मतेही भाजपाच्या पारड्यात पडली आहेत. 


भाजपाकडे स्वतःची 122 शिवसेनेची 62 अपक्ष 7 आणि रासप 1 अशी 192 मते होती. मात्र भाजपाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना 208 मते मिळाली आहेत. म्हणजेच आपल्या संख्याबळापेक्षा राज्यात भाजपाने 16 मते जास्त मिळवली आहेत.


एकीकडे काँग्रेसचे काही नेते भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा असतानाच काँग्रेसची मते फुटल्याने ही काँग्रेससाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. भाजपाचा वाढता प्रभाव आणि विरोधकांची हतबलता या मतफुटाला कारणीभूत असल्याचीही चर्चा आहे.