घटनेचा भंग केला म्हणून राज्यात राष्ट्रपती राजवटही लागू शकते : चंद्रकांत पाटील
आजपासून विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आणि अंतिम आठवडा सुरू होत आहे. आज विधीमंडळात कायदा सुव्यवस्थेविषयी प्रश्न उपस्थित करणार आहेत.
मुंबई : आजपासून विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आणि अंतिम आठवडा सुरू होत आहे. आज विधीमंडळात कायदा सुव्यवस्था यावर विरोधक आक्रमक आहेत.
'हे सरकारमध्ये प्रचंड गोंधळ आहे. महाविकास आघाडीने निवडणुकांचा खेळखंडोबा केला आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसंदर्भातही नियमात बदल करून महाविकास आघाडी सरकार तारीख मागतंय, राज्यपाल यांनी दोनदा तारीख देऊनही सरकारने काहीही केलं नाही', असं भाजपनेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधलाय. नियमांत बदल करून महाविकासआघाडी सरकार तारीख मागताय. राज्यपालांनी दोनदा तारीख देवूनही सरकारनं काहीही केलं नाही. घटनेचा भंग केला म्हणून राष्ट्रपती राजवटही लागू शकते अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी दिलीय.