मुंबई : महिला कैदी मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणातून दबाव आल्यानं मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांचं नाव याचिकाकर्त्यानं काढून टाकल्याची चर्चा सुरू झाली आहे. पडसलगीकर यांचं नाव काढण्याचा अर्ज याचिकाकर्त्यानं किला कोर्टात केला आहे.


मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणात एकूण ९ जणांची ब्रेन मॅपिंग, नार्कोटेस्ट आणि लायडिटेक्टर चाचणी करावी असा अर्ज याचिकाकर्त्यांनी गेल्या महिन्यात न्यायालयात केला होता. त्यात पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांचेही नाव होते. पडसालगीकर यांचं नाव काढण्याचा अर्ज का देता, अशी विचारणाही न्यायालयानं केली. त्यावर तांत्रिक अडचणी असल्याचं याचिकाकर्त्यानं सांगितलं. पण पडसलगीकर यांचं नाव काढण्यासाठी याचिकाकर्त्याला वारंवार लोकांचे फोन येत असल्याची चर्चा आहे.