मुंबई :  कोरोनाची (Corona) लाट आणि वाढती महागाई या साऱ्याशी जनता दोन हात करत असतानाच आता यामध्ये आणखी भर पडली आहे. महागाईचा आणखी जोरदार मारा सर्वसामान्य नागरिकांवर होत आहे. अमूल या दूध उत्पादक कंपनीकडून दुधाच्या दरांत वाढ करण्यात (Amul Price Hike) आली असल्यामुळे आता, रोजच्या वापरात असणाऱ्या दुधासाठीही नागरिकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. ( price hike amul increased the price of milk by rupees 2 from 1 july 2021)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किती रुपयांनी दरवाढ?


पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांचे परिणाम आता थेट दैनंदिनं जीवनातील वापरात असणाऱ्या वस्तूंवरही होताना दिसत आहेत. अमूलनं दुधाच्या दरांत प्रती लिटरमागे दोन रुपयांची वाढ केली आहे. गुरुवारपासून म्हणजेच 1 जुलै 2021 पासून देशातील सर्व राज्यांमध्ये हे नवे दर लागू करण्यात येणार आहेत.


दिल्ली एनसीआरसोबत देशातील सर्वच भागांमध्ये नव्या दरानं दुधाची विक्री केली जाणार आहे. अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल ताजा, अमूल टी स्पेशल, अमूल स्लिम अॅन्ड ट्रीम अशा प्रकारांमध्ये प्रती लिटरमागे 2 रुपये इतक्या फरकानं वाढ करण्यात आली आहे.


दीड वर्षांनंतर झाली दरवाढ


जवळपास दीड वर्षांनंतर अमूलनं दूध दरांमध्ये वाढ केली आहे. ज्यामुळं हे दर आता (अमूल गोल्डसाठी) 58 रुपये प्रती लीटर इतके झाले आहेत. या दरवाढीमुळं रोजच्या खर्चाचं गणित हे काही अंशी बिघडणार आहे हे मात्र नक्की.


इतर कंपन्याही दरवाढ करण्याची शक्यता


अमूलसोबतच देशात नेस्ले, ब्रिटानिया, नमस्ते इंडिया, पतंजली अशा कंपन्याही खासगी स्तरावर दुधाचे दर वाढवण्याची शक्यता आहे. 


संबंधित बातम्या : 


1 जुलैपासून या 7 महत्त्वाच्या गोष्टी बदलणार


'या' बँकेनं IFSC कोड बदलण्याचा घेतला निर्णय, हा कोड कसा मिळवायचा?