अंगणवाडी सेविकांच्या संपाविरोधात जनहित याचिका
राज्यात अंगणवाडी सेविकांच्या राज्यव्यापी संप सुरु आहे. या संपाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे या संपाबाबत न्यायालय काय निर्णय घेते, याकडे आता लक्ष लागले आहे.
मुंबई : राज्यात अंगणवाडी सेविकांच्या राज्यव्यापी संप सुरु आहे. या संपाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे या संपाबाबत न्यायालय काय निर्णय घेते, याकडे आता लक्ष लागले आहे.
अंगणवाडी सेविकां कर्मचाऱ्यांचा संप सलग १२ व्या दिवशी सुरू आहे. यामुळे लहान मुलांचे हाल होत असल्याचा दावा या जनहित याचिकेत करण्यात आलाय.
संप तातडीने थांबवून सर्वांना कामावर रूजू होण्याचे निर्देश देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. राजकीय फायद्यासाठी संपाला पाठींबा देणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आलेय.
दरम्यान, राज्य सरकारने सेविकांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी करण्यात आलेय. ही जनहित याचिका अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. याबाबत पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.