रोमियोपासून सुटका मिळवण्यासाठी पुण्याच्या महिला मुंबईत
एका रोडरोमियोपासून सुटका मिळवण्यासाठी पुण्यातल्या महिलांना मुंबई गाठावी लागलीय.
मुंबई : एका रोडरोमियोपासून सुटका मिळवण्यासाठी पुण्यातल्या महिलांना मुंबई गाठावी लागलीय. मुंबईत मुलुंडमध्ये राहणारा महेंद्र साळवी हा पुण्यातल्या खेड तालुक्यातल्या पईट गावातल्या महिलांना अश्लील मेसेजेस पाठवत होता.
त्याच्या मेसेजना कंटाळलेल्या या महिलांनी गावात तक्रार नोंदवण्याची विनंती केली. पण पोलिसांनी केवळ अर्ज लिहून घेतला. त्यानंतर या इसमाने महिलांना वारंवार धमकावण्यास सुरूवात केली. अखेर या महिलांनी चाकण पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पण तिथूनही पोलिसांचं सहकार्य न मिळाल्याने अखेर महिलांनी मुंबई गाठली.