पंजाब बॅंक अपहार : पासवर्ड चोरुन केला महाघोटाळा
पंजाब नॅशनल बॅंकेच्या फोर्ट येथील ब्रैडी हाऊस शाखेवर पुन्हा एकदा सीबीआयने छापा टाकलाय. नीरव मोदी अपहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आलीये. दरम्यान, हा घोटाळा पासवर्ड चोरुन करण्यात आल्याचे पुढे आलेय.
मुंबई : पंजाब नॅशनल बॅंकेच्या फोर्ट येथील ब्रैडी हाऊस शाखेवर पुन्हा एकदा सीबीआयने छापा टाकलाय. नीरव मोदी अपहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आलीये. दरम्यान, हा घोटाळा पासवर्ड चोरुन करण्यात आल्याचे पुढे आलेय.
फोर्ट येथील शाखा केली सिल
सीबीआयने रविवारी उशीरा सीबीआयनं पंजाब नॅशनल बॅंकेच्या फोर्ट येथील ब्रैडी हाऊस शाखा सिल केली होती. या प्रकरणाचा मास्टरमाईंड गोकुलनाथ शेट्टी, मनोज खरात आणि निरव मोदी कंपनीच्या अकाऊंटंटनं ब्रैडी हाऊस शाखेतून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी लागणारे पासवर्ड चोरले होते.
गेल्या ७ वर्षांपासून अपहार
याच पासवर्डच्या सहाय्यानं नीरव मोदी आणि त्याच्या कंपनीनं गेल्या ७ वर्षात जवळपास ११ हजार ४०० कोटींचा अपहार केला. हे प्रकरण उघड झाल्यानंतर सक्तवसुली संचालनालयानं जवळपास ३५ ठिकाणी छापे टाकून सुमारे ६ हजार कोटी रुपयांचे दागिने आतापर्यंत जप्त केलेत.