COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेने नीरव मोदी यांनी केलेल्या घोटाळ्या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. बँकेचे एमडी सुनील मेहता यांनी घोटाळ्यावर बोलताना म्हटलं आहे. पीएनबीची १२३ वर्षांची परंपरा आहे, स्वच्छ व्यवहारांवर आमचा विश्वास आहे. 


बँकेने स्वत:हून हा घोटाळा समोर आणला-पीएनबी


तसेच आम्ही सांगू इच्छीतो की बँकेने स्वत:हून हा घोटाळा समोर आणला आहे. भ्रष्टाचाराचा सुगावा लागल्यानंतर आम्ही याविरोधात अॅक्शन घेतली आहे.


तक्रार आम्ही सीबीआयकडे दाखल केली-पीएनबी


जानेवारी महिन्याच्या शेवटीच याविषयीची तक्रार आम्ही सीबीआयकडे दाखल केली होती. दोषींपर्यंत पोहचण्यासाठी तसेच या अडचणीचा सामना करण्यासाठी आम्ही एक अॅक्शन प्लान तयार केला आहे. हा प्लान पूर्ण व्हावा, म्हणून आम्ही उशीरा मीडियासमोर आलोय.


पंजाब नॅशनल बँक संकटात नाही-पीएनबी


परिस्थितीशी लढण्याची आमच्याकडे पूर्ण क्षमता आहे. पंजाब नॅशनल बँक संकटात नाही, पण जर आपल्याला कॅन्सर झाला, तर तो डिटेक्ट करून त्यावर उपचार करावा लागतो, तसा हा प्रकार आहे, तो आम्ही डिटेक्ट केला आहे, आता दोषींविरोधात कारवाईचा अॅक्शन प्लान असल्याचं बँकेचे एमडी सुनील मेहता यांनी म्हटलं आहे.