Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची महत्वाची घोषणा
देशासह अनेक राज्यांमध्ये लम्पी रोगाचा (Lumpi Disease) कहर वाढत चालला आहे. 15 राज्यांतल्या 175 जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झालाय.
मुंबई : देशासह अनेक राज्यांमध्ये लम्पी रोगाचा (Lumpi Disease) कहर वाढत चालला आहे. 15 राज्यांतल्या 175 जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झालाय. 15 लाखांहून अधिक गायींना या आजाराची लागण झालीय. तर आत्तापर्यंत 57 हजार गायींचा मृत्यू झालाय. महाराष्ट्रात (Maharashtra)17 जिल्ह्यांमध्ये या आजाराचा फैलाव झालाय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. (quarantine center also for lumpy skin dises cow important announcement of chief minister eknath shinde)
कोरोनामध्ये सर्वसामांन्यांसाठी कोरोना सेंटर उभारण्यात आले होते. त्यानुसार आता लम्पीग्रस्त जनावरांसाठीही क्वारंटाईन सेंटर उभारण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची महत्वाची घोषणा केली आहे. लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिंदे सरकारचा निर्णय घेतला आहे. विनोद पाटील यांनी केली होती क्वारंटाईन सेंटरची मागणी केली होती. अखेर त्यांच्या या मागणीला यश आलं आहे.
राज्यांकडून उपाययोजना तसंच लसीकरण
लम्पी आजाराचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यांकडून उपाययोजना तसंच लसीकरणकरण्यात येतंय. सध्या लम्पीचा संसर्ग एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पसरत असल्याचं चित्र दिसतंय. लम्पी आजारावर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागानं आवश्यक पावलं तातडीनं उचलावीत, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
लम्पी आजाराची लक्षणं (Lumpy skin disease Symptoms)
जनावरांच्या डोळ्यांतून, नाकातून पाणी
लसिकाग्रंथींना सूज येणं, ताप येणं
दुधाचं प्रमाण कमी होणं
तोंडात व्रण आल्याने चारा खाणे, पाणी पिणे कमी होणं
त्वचेवर मोठ्या गाठी येणं
पायावर सूज आल्यानं जनावरं लंगडतात