मुंबई : लोकल ट्रेनमध्ये सीटवर बसण्याच्या वादातून राडा झालाय. कल्याणहून अंबरनाथच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये हा प्रकार घडलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या लोकलमधून नियमित प्रवास करणाऱ्या टोळक्यानं एका तरुणाला दादागिरी करत मारहाण केलीय. कल्याण स्टेशनहून अंबरनाथकडे जाणारी लोकल या तरुणाने पकडली. त्यानंतर हा तरुण सीटवर बसण्यासाठी गेला असता नियमित प्रवास करणाऱ्या टोळक्यानं त्याला सीटवर बसू दिलं नाही. त्याचा गळा पकडून बेदम मारहाण करत ट्रेनमधून उतरवलं. सध्या हा व्हिडीओ व्हायरल झालाय. 


लोकलमध्ये सीटवर बसण्याचे अनेक वाद होत असतात. विशेषत: चौथ्या सीटवर बसण्यावरून हे वाद होतात. काही प्रवाशांचे ग्रुप असल्याने त्यांची दादागिरी अन्य प्रवाशी रोजच सहन करीत असतात. तसेच हे टोळके अन्य प्रवाशांना सीटवर बसू देत नाही.


लोकलमध्ये दादागिरी करणाऱ्या प्रवाशांची ग्रुपबाजी आणि दादागिरीला आळा घालण्यात रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाचे जवान अपयशी ठरल्याचा आरोप सर्वसामान्य प्रवाशांकडून करण्यात येतोय.