तकलादू आरक्षण नको - विरोधक
कोर्टात टिकेल असं आरक्षण मिळायला हवं, अशी भूमिका विरोधकांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडली.
मुंबई : कोर्टात टिकेल असं आरक्षण मिळायला हवं, अशी भूमिका विरोधकांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडली. तसचं सोमवारी विरोधक काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक होणार असून, पुढे काय करायचे याचा निर्णय़ करण्यात येणार आहे. या मुद्द्यावर राज्यपालांच्या भेटीची वेळही विरोधकांनी मागितलेली आहे. भाजपने आता केंद्रात मराठा आरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणीही विरोधकांनी केली आहे. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मात्र मोन पाळलं. त्यांनी या बैठकीबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.