मुंबई : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'जादू की झप्पी' काय दिली, आणि शिवसेना पुन्हा एकदा राहुल गांधींच्या प्रेमातच पडली. 'सामना'मधून राहुल गांधींच्या मिठीचं कौतुक करण्यात आले आहे. तेही भावा, जिंकलंस या शब्दांत... त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस हे नवं नातं निर्माण झालंय की काय, असा प्रश्न पडलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेला अधूनमधून राहुल प्रेमाचं भरतं येत असतं, विशेषतः गुजरात निवडणुकीनंतर हे प्रेम जास्तच वाढलंय, हे बाकी खरंच. खरं तर शिवसेना कट्टर हिंदुत्ववादी पक्ष आणि काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष... पण दोघांचा राजकीय शत्रू एकच.  त्यामुळेच  २०१९ पर्यंत भाजपला डिवचण्यासाठी शिवसेनेला निमित्त लागतं, यंदा ते निमित्त राहुल  गांधींच्या जादू की झप्पीचं आहे.