पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल रद्द केल्याने प्रवाशांचा रेलरोको
नायगाव स्थानकात संतप्त प्रवाशांनी अर्धा तास रेल रोखून धरल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. नायगाव स्थानकावर आल्यानंतर प्रवाशांना लोकल रद्द करण्यात आलेचे समजताच प्रवाशी संतप्त झालेत आणि त्यांनी रेलरोको आंदोलन केले.
मुंबई : नायगाव स्थानकात संतप्त प्रवाशांनी अर्धा तास रेल रोखून धरल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. नायगाव स्थानकावर आल्यानंतर प्रवाशांना लोकल रद्द करण्यात आलेचे समजताच प्रवाशी संतप्त झालेत आणि त्यांनी रेलरोको आंदोलन केले.
पश्चिम रेल्वेने लोकलचे नवीन वेळापत्रक लागू केले आहे. या वेळापत्रकानुसार नायगाव स्थानकातून सकाळी ७.५० ला सुटणारी वसई-अंधेरी लोकल ऐन वेळेस रद्द करण्यात आली. रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना तशी कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. ही लोकल रद्द झाल्याची माहिती मिळताच प्रवासी संतप्त झालेत. स्थाकात शनिवारी सकाळी प्रवाशांनी रेलरोको आंदोलन सुरु केले. त्यामुळे पश्चिम मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
लोकला उशिर होत असल्याने प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. त्यांनी थेट रूळांवर उतरत रेलरोको आंदोलन करण्यास सुरुवात केली. प्रवाश्यांनी रेल्वे रूळावर ठाण मांडून रेल्वे प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सध्या विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली.
रेल्वेरोकोमुळे सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या नोकरदार वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, रेलरोकची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर प्रवाशांना ट्रॅकवरून हटविण्यात येत आहेत. पोलीस संतप्त प्रवाशांची सजूत काढताना दिसत होते.
पश्चिम रेल्वेवर तीन ते चार मिनिटांनी लोकल असताना एक लोकल रद्द झाल्याने प्रवाशांनी रेलरोको करणे चुकीचे होते. एक लोकल रद्द झाल्याने अन्य प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागला. दरम्यान, पश्चिम रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झालाय. याची कल्पना किमान एक दिवस आधी देण्याची गरज होती, अशी संतप्त प्रतिक्रिया काही प्रवाशांनी दिली.