मुंबई : रविवारी सुट्टीच्या दिवशी घरातून बाहेर पडायचा विचार करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती येत आहे. रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी जम्बो ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामूळे गाड्यांचे वेळापत्रक जाणून घेऊनच घराबाहेर पडा, अन्यथा खोळंबा होण्याची शक्यता आहे. केवळ मुंबई लोकलच नाही तर जम्बो ब्लॉकचा मेल-एक्स्प्रेसलाही फटका बसणार आहे. 


पश्चिम रेल्वे मार्गावर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१) पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गांवर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ दरम्यान ब्लॉक


२) दरम्यान चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान जलद लोकल धावणार नाही.


३) सीएसएमटी ते चुनाभट्टी / वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत ब्लॉक


४) चुनाभट्टी/वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११ ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक 


मध्य रेल्वे मार्गावर..


१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.०५ ते दुपारी ३.२२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन मार्गावरील जलद गाड्या गंताव्य स्थानकावर २० मिनिटे उशिराने पोहोचतील. या गाड्या नियोजित स्टेशन्सव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांवर थांबणार आहेत.


२)  मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर, पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाउन मार्गावर आणि हार्बरच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी / वांद्रे या मार्गांदरम्यान जम्बो ब्लॉक. त्यामूळे या मार्गावरील प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.


३) कल्याणहून सकाळी १०.३८ ते दुपारी ३.५७ वाजेपर्यंत अप जलद मार्गावर सुटणाऱ्या सर्व उपनगरीय गाड्या, दिवा ते परळ स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. 
 
४) मुलुंड ते माटुंगा जलद मार्गावर रविवारी सकाळी ११.१५ ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक 


५)  परळ स्थानकापर्यंत सर्व स्थानकांवर थांबल्यानंतर या गाड्या पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील.


हार्बर रेल्वे मार्गावर...


१)सीएटीएम येथून सकाळी ९.५६ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या उपनगरीय गाड्या रद्द


२)वडाळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी ११.३४ वाजल्यापासून दुपारी ४.४७ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या गाड्या रद्द


३) ब्लॉक दरम्यानच्या काळात कुर्ला स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वरून विशेष लोकल धावणार आहे याची नोंद ठेवा.


४) पनवेल/बेलापूर/ वाशीवरून सकाळी ९.५३ वाजल्यापासून दुपारी ३.२० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेने जाणाऱ्या लोकल रद्द


५) अंधेरी/वांद्रेवरुन सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.०९ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरीय लोकल रद्द