मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! आज लोकल कोणत्या मार्गावर वळणार? जाणून घ्या लोकलचे वेळापत्रक
Railway Mega Block: रेल्वे रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (14 जानेवारी 2024) रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mega Block News In marathi : रविवारी तुम्ही जर घराबाहेर पडणार असाल तर आधी रेल्वे प्रवासाचे नियोजन करा. कारण आज (14 जानेवारी) रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असल्याने तुमच्या लोकल प्रवासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेवर शनिवारी दुपारी 11.40 ते रविवारी पहाटे 3.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम सुरु राहील. तर रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
हार्बर मार्गावरील वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान अप-डाऊन मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान जलद मार्गावर मेगाब्लॉक असेल अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली. याशिवाय मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण पाचव्या-सहाव्या मार्गावर शनिवारी रात्रीचा ब्लॉक असणार आहे. यामुळे रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मेगाब्लॉक नसेल, असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पश्चिम आणि हार्बर ब्लॉकदरम्यान काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून लोकल गाड्यांना उशीर धावतील.
मध्य रेल्वे
ठिकाण - ठाणे ते कल्याण
मार्ग - 5वी आणि 6वी मार्गिका
वेळ - शनिवारी रात्री 11.40 ते रविवारी पहाटे 3.40 पर्यंत
मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे पाचव्या आणि सहाव्या मार्गावरील मेल-एक्स्प्रेस जलद अप-डाऊन मार्गावर धावणार आहेत. त्यामुळे मेल-एक्स्प्रेस 15 ते 20 मिनिटे उशिराने धावतील. रात्रीच्या ब्लॉकमुळे रविवारी सीएसएमटी ते कल्याण दरम्यान कोणताही ब्लॉक नसेल.
हार्बर रेल्वे
ठिकाण - वडाळा रोड ते मानखुर्द
मार्ग - अप आणि डाऊन
वेळ: सकाळी 11 ते दुपारी 4
हार्बरवर वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी/बेलापूर/पनवेल अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहतील. सीएसएमटी ते गोरेगाव लोकल वेळापत्रकानुसार धावणार असून पनवेल ते मानखुर्द दरम्यान विशेष लोकल धावणार आहे.
पश्चिम रेल्वे
ठिकाण - सांताक्रूझ ते गोरेगाव
मार्ग - अप आणि डाऊन जलद
वेळ: सकाळी 10 ते संध्याकाळी 5
ब्लॉकदरम्यान जलद मार्गावरील लोकल फेऱ्या पश्चिम रेल्वेवरील धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहतील तर काही लोकलच्या फेऱ्यांना विलंबाने धावणार आहेत.