मुंबई : मुंबई आणि आसपासच्या परिसरातून दररोज लाखो प्रवासी लोकल ट्रेनने प्रवास करतात. यावेळी गर्दीचा फायदा घेत अनेकजण चोरी करतात. कुणी प्रवाशांचे मोबाईल हिसकावून पळ काढतं तर कुणी पाकिट मारतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांचा मोबाईल फोन हिसकावणाऱ्या अशाच एका टोळीला रेल्वे पोलिसांनी गजाआड केलं आहे. या आरोपींकडून पोलिसांनी १८ स्मार्टफोन्सही जप्त केले आहेत.


ही चोरट्यांची टोळी धावत्या लोकलमध्ये दरवाजात उभे असलेल्या प्रवाशांच्या हातावर फटका, काठी मारत त्यांच्याकडील मोबाईल फोन्स लंपास करत असतं.


समिरा मार्कंडे या महिला प्रवाशासोबतही असाच प्रकार २७ ऑक्टोबर रोजी घडला होता. मुलुंड ते ठाणे असा डाऊन स्लो मार्गावर लोकलने महिलांच्या डब्यातुन दरवाजात उभे राहुन प्रवास करत असताना कोपरी ब्रीज येथे दोन अनोळखी इसमांनी रेल्वे ट्रॅकलगतच्या पोलवर उभे राहुन समिरा यांच्या हातावर फटका मारला. यावेळी समिरा यांच्या हातातील ६२,५०० रुपये किमतीचा स्मार्टफोन खाली पडला. हा फोन घेऊन आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला.


आरोपी हे फोन मोबाईल रिपेअरिंग करणाऱ्या रमाकर सिंग याला विकत असत. यानंतर रेल्वे पोलिसांनी कारवाई करत या तिघांना अटक केली आहे.