कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकातील आज मोठी घटना होता होता टळली. चुकीची लांब पल्ल्याची गाडी पकडली आहे हे लक्षात आल्या नंतर एक्सप्रेस सुरू झाल्या नंतर खाली उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला स्थानकावरील रेल्वे पोलिसांनी वाचवलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिता पुत्रांनी उलट दिशेने उतरण्याचा प्रयत्न केला. यामुळे ते रेल्वेच्या खाली येता-येता वाचले. पण कल्याण रेल्वे स्थानकात तैनात असणाऱ्या रेल्वे पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत या दोघांना वाचवले.


ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.