मुंबई :  रेल्वेत स्टंटबाजी करतानाचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून, त्यात एका प्रवाश्याचा फोन चोरताना काही टवाळखोर तरुण दिसत आहेत. मुंबईतल्या हार्बर मार्गावरच्या जिटीबी रेल्वे स्थानकातून ट्रेन जात असताना अपंग प्रवाशाचा मोबाईल या तरूणांनी चोरल्याचं या सेल्फी व्हिडिओत चित्रीत झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे तरुण कोण आहेत हे स्पष्ट झालेलं नसलं तरी, हा व्हिडिओ चुनाभट्टी आणि जीटीबीनगर दरम्यानचा असल्याच समजतंय.  सध्या या व्हिडिओच्या मदतीने रेल्वे पोलीस धावत्या गाडीत धुडगूस घालणाऱ्या या तरुणांचा शोध घेतायत. या व्हिडिओत हे तरुण ट्रेनच्या खिडकीवर चढून, दरवाज्यावर लटकून, किंचाळत स्टंटबाजी करत होते.  या टवाळखोरीबाबत मुंबईकरांनी संताप व्यक्त केलाय.