मुंबई: कल्याण रेल्वे स्थानकाजनजीक रुळाला तडा गेल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे लोकल ट्रेन आणि एक्स्प्रेस गाड्यांचा खोळंबा झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, रात्री दहा वाजताच्या सुमारास कल्याण आणि शहाड स्थानकादरम्यान रुळाला तडा गेल्याचे निदर्शनास आले. यानंतर या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली. सध्या रुळाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सगळ्यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. कल्याणहून कसाऱ्याच्या दिशेने जाणारी रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक लोकल ट्रेन आणि मेल एक्स्प्रेस कल्याण स्थानकातच अडकून पडल्या आहेत. रात्रीच्यावेळी कल्याण स्थानकातून बाहेरगावी जाणाऱ्या बऱ्याच एक्स्प्रेस गाड्या सुटतात. या सर्व एक्स्प्रेस गाड्यांचा सध्या खोळंबा झाला आहे. 



दरम्यान, रेल्वेकडून सध्या रुळाच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. आणखी अर्ध्या तासात वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे.