मुंबई :  विकेंडला पावसानं मुंबईकरांना सरप्राईज गिफ्ट दिलंय.. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं कालपासून मुंबईसह राज्यभर जोरदार हजेरी लावलीये.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई आणि उपनगरांसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, पालघर, नवीमुंबईत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडतोय.. रात्रभर पडत असलेल्या पावसानं मध्य रेल्वेचं  वेळापत्रक कोडलमडलंय.. 


अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचलंय.. मात्र विकेंड असल्यानं जनजीवनावर त्याचा फारसा परिणाम झालेला दिसून येत नाहीये.. उलट विकेंड असल्यानं ठिकठिकाणी मुंबईकर पावसाचा मनमुराद आनंद लुटताना पहायला मिळताहेत.. त्यात आज वर्षातली सर्वात मोठी भरती आहे..


 त्यामुळे समुद्रालाही उधान आलंय.. ही भरती सुमारे 4.97 मीटरची असल्यानं समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनानं समुद्र किनारी रहाणा-या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिलाय.. शिवाय समुद्र किनारी जाऊ नका आणि गेलाच तर किना-यापासून दूर रहा असा इशारा महापालिका प्रशासनानं दिलाय..