मुंबई : गेल्या तीन आठवड्यांपासून राज्याकडे पाठ फिरवलेला पाऊस या आठवड्याच्या अखेरीस सक्रीय होणार असल्याचा अंदाज कुलाबा वेध शाळेनं वर्तवलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या १८ आणि १९ ऑगस्टला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि दुष्काळाचं सावट असलेल्या मराठवाड्याच्या काही भागांत अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. तर काही भागात मुसळधार पावसाची चिन्ह आहेत. 


पश्चिम किमारपट्टीवर मोसमी वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यानं दोन दिवस मुंबईत पावसानं हजेरी लावली. कोकणात अधूनमधून बरसत असला तरी राज्यातल्या बहुतांश भागात तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ पावसानं पाठ फिरवलीय. त्यामुळं खरिपाची पिकं करपू लागली आहेत. 


मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि खान्देशात खरिपाचा हंगाम तर हातातून गेल्यातच जमा आहे. त्यामुळं राज्यातली जनता पावसाची मोठ्या आतूरतेनं वाट पाहत आहे.