गुरुवारी रात्रीपासून मुंबईत पाऊस आणि विजांचा कडकडाट
मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस सुरु आहे. गुरुवारी रात्रीपासून सुरु झालेला मुसळधार पाऊस सकाळीही सुरुच आहे.
मुंबई : मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस सुरु आहे. गुरुवारी रात्रीपासून सुरु झालेला मुसळधार पाऊस सकाळीही सुरुच आहे.
विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुंबई आणि आसपासच्या परिसरात पाऊस सुरु आहे. या पावसामुळे शाळा, कॉलेजला जाणारे विद्यार्थी आणि कामावर जाणाऱ्यांचे हाल होत आहेत.
मुंबई उपनगरातील सांताक्रुझ, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवलीमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय. ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूरमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावलीय.
बदलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय. तसंच रेल्वे रुळावरही पाणी आलंय. मात्र या पावसामुळे रस्ते आणि लोकल वाहतुकीवर सध्या तरी कोणताही परिणाम झालेला नाही.
गेला आठवडाभर उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय.