मुंबई : राज्यात सप्टेंबर महिन्यात हलका ते मध्य स्वरूपात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेन वर्तवलीये. राज्यात सरासरी पाऊस पडला असला तरी संपूर्ण विदर्भात मात्र पावसाने सरासरी गाठली नाही. विदर्भात सरासरीपेक्षा 27 मिमी पाऊस कमी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे मराठवाड्यातील धरणही अजून भरलेली नाहीत. तसंच सांगली आणि कोल्हापूर जिल्हातही सरासरी पेक्षा कमी पावसाची नोंद आहे. तर उत्तर महाराष्ट्रात जळगाव, नंदुरबार जिल्हातही कमी पाऊस झालाय. राज्यात आत्तापर्यंत सरासरी ८१४ मिमी पाऊस झाला.