मुंबई : मुंबईत पावसाची संततधार सतत सुरूच आहे. मध्य रेल्वेची वाहतूक सुरू झाली आहे पण गाड्या उशिरानं धावत आहेत. मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येऊ शकेल. दुसरीकडे हार्बर रेल्वे मार्गावर वाशी - पनवेल वाहतुकीला सुरुवात झालीय. सीएसएमटी - वाशी लोकल वाहतूक लवकरच सुरू होईल. रस्ते वाहतूकही संथ गतीनं सुरू आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी स्टेशनवरून कर्जतला ६.२५ वाजता पहिली रेल्वे रवाना झालीय. दरम्यान, रेल्वे बंद असल्यानं बेस्टनं रस्त्यावर काही ज्यादा गाड्या सोडण्यात आल्यात. त्यामुळे रस्त्यांवरही बाहेर पडलेल्या प्रवाशांची गर्दी दिसून येतेय. 



रविवारी (४ ऑगस्ट) पहाटे ००.१० वाजता निघणारी सीएसएमटी - वाराणसी महानगरी एक्सप्रेसची वेळ बदलण्यात आलीय. आता ही एक्सप्रेस रविवारी पहाटे ०४ वाजून २० मिनिटांनी सुटेल. 


तसंच शनिवारी (३ ऑगस्ट) रोजी रात्री २३.४५ वाजता सुटणारी सीएसएमटी - एमजीआर चेन्नई सेंट्रल मेलही रविवारी पहाटे ०४.०० वाजता सुटेल.