मुंबई : मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला असून समुद्र किनारी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरात जोरदार मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, गरज असेल तरच घराबाहेर पडा, समुद्र किनारी ठिकाणी जाणे टाळा, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. तर दुसरीकडे पनवेलमध्ये विक्रमी पावसाची नोंद केली आहे. पनवेलमध्ये गेल्या २४ तासांत २३० मिमी पाऊस पडला आहे. या पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. कुर्ला आणि सायन येथे रुळावर पाणी साचू लागले आहे. त्यामुळे मध्य रेल्वे आणि हार्बरवरील गाड्या उशिराने धावत आहेत. २५ ते ३० मिनिटे गाड्या उशिराने धावत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतल्या किंग्स सर्कल आणि शीव परिसरात रस्त्यावर पाणी साचले आहे. त्यामुळे रस्ते वाहतूकही धीम्या गतीनं सुरु आहे रेल्वे वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. मुंबई महापालिकेने शाळांना सुट्टी जाहीर केलीय. पनवेलमध्ये गेल्या २४ तासांत २३० मिमी पाऊस पडला आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी परिसरातही रात्रभर जोरदार पाऊस बरसत आहे. 


दरम्यान, मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाने सकाळी ८ नंतर पुन्हा जोर धरला आहे. मुसळधार पाऊस कोसळत आहे. येत्या ३६ तासांमध्ये मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.