मुंबईच्या काही भागात सकाळी-सकाळी रिमझिम पाऊस
उन्हानं लाहीलाही झाल्यानंतर अचानक पावसाच्या गार गार थेंबाचा शिडकावा झाला आणि मुंबईकरांची आजची सकाळ प्रसन्न झाली.
मुंबई : उन्हानं लाहीलाही झाल्यानंतर अचानक पावसाच्या गार गार थेंबाचा शिडकावा झाला आणि मुंबईकरांची आजची सकाळ प्रसन्न झाली. गेल्या काही दिवसांत घामाच्या धारांनी हैराण झालेल्या मुंबईकरांना आज पावसाच्या धारांनी भिजवलं. ऑफिसला जाताना अनपेक्षित आलेल्या पावसामुळे सगळं वातावरणच बदलून गेलं.
सारचं कसं लख्ख लख्ख दिसायला लागलं. झाडांची पानं फुलं पक्षी, रस्ता सारंच या पावसात न्हानू निघालं आणि सगळंच रम्य वाटायला लागलं. दिवसाची अशी सुरुवात मुंबईकरांचा मूडच बदलून गेली.
सध्या दादर, महालक्ष्मी ,कुलाबा, भायखळा, सांताक्रुझ, अंधेरी आणि बोरीवलीदरम्यान ढगाळ वातावरण आहे. पूर्व उपनगरात कुर्ला घाटकोपर मुलुंडपर्यंत पावसानं हजेरी लावली. तर ठाणे, डोंबिवली आणि कल्याणमध्येही सरी बरसल्या.